Grape Season
sakal
नांदूर मध्यमेश्वर: दर वर्षी डिसेंबर महिन्यात जोरात सुरू होणारा द्राक्ष हंगाम यंदा तब्बल दीड महिना उशिरा आणि अत्यंत धिम्या गतीने सुरू झाला आहे. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला १५० ते २०० रुपये प्रति किलो असा तुलनेने चांगला भाव मिळत असला, तरी दीर्घकाळ लांबलेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी तालुक्यातील जवळपास ७० टक्के द्राक्षबागांना फळधारणा झालेली नाही, याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होत आहे.