नाशिक- झटपट पैसे कमविण्यासाठी अमली पदार्थांची विक्री करण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या दोन संशयितांना एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जसह अटक करण्यात आली. दोन संशयितांकडून ६५ हजारांचे १३ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. संबंधित कारवाई शहर गुन्हे शाखा युनिट दोन व अमली पदार्थविरोधी पथक यांनी संयुक्तपणे केली.