पंचवटी: नांदूर नाका येथे आठ दिवसांपूर्वी किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेला राहुल धोत्रे (रा. जनार्दननगर) याचा उपचारांदरम्यान शुक्रवारी (ता. २९) मृत्यू झाला. ही घटना समजताच नांदूर नाक्यासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला असून, या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह अन्य संशयितांवर वाढीव कलमांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.