स्नेहमेळाव्यात वर्गमित्रांनी जागविल्या आठवणी

स्नेहमेळाव्यात वर्गमित्रांनी जागविल्या आठवणी
Published on: 
NSK26H35119 नंदुरबार : एकलव्य विद्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले विद्यार्थी. --- वर्गमित्रांनी दोन दशकांनंतर जागविल्या आठवणी एकलव्य विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : तब्बल २१ वर्षांपूर्वी दहावी उत्तीर्ण झालेल्या एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जीवनाच्या विविध क्षेत्रात स्थायिक झालेल्या या विद्यार्थ्यांनी शाळेतील गुरुजनांनी केलेल्या संस्कारांमुळेच आपण घडलो, अशी भावना व्यक्त केली. स्नेहमिलनाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर होते. नितीन गावित यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी दहाव उत्तीर्ण झाल्यानंतरचा प्रवास मांडला. आपल्या मित्रांचा आणि विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास ऐकताना विद्यार्थी व शिक्षक रंगून गेले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनातील विविध आठवणी जागविल्या. शिक्षकांतर्फे निवृत्त शिक्षक हेमंत खैरनार, विलास वाघ, अशोक पाटील, हारुन कागझी, मंगला मोरे यांनी तर विद्यमान शिक्षकांपैकी पर्यवेक्षक टिका पाडवी, भूपेंद्र पाटील, विजया न्हायदे व संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्याना भेटून आनंद द्विगुणित झाला. शाळा व संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेल्या योगदानाची तुम्ही जाणीव ठेवली ही महत्वाची गोष्ट आहे. शाळा व संस्थेच्या प्रगतीसाठी या विद्यार्थ्यांनी असेच योगदान देत राहावे, असे आवाहन डॉ. सुहास नटावदकर यांनी केले. व्यासपीठावर माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, निवृत्त शिक्षिका रेखा पाटील, मिलिंद वडनगरे, जकू गावित, जयदीप नटावदकर, डॉ. समिधा नटावदकर, रायसिंग वसावे उपस्थित होते. माजी विद्यार्थी आपसिंग वसावे यांनी सूत्रसंचालन केले. मयूर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जागृती पाटील, डॉ. श्रद्धा वसावे, दीक्षा वसावे, राकेश पाडवी, शैलेंद्र वळवी, विजय बागले, दानियल वळवी, विनोद पाडवी, अर्जुन वळवी, फिरोज जमादार, भूषण पटेल, गोविंद राऊत, जमुना वळवी, भानुप्रिया पाडवी, शैला तडवी, सुनंदा पाडवी, ज्योती तडवी, पंकज पाडवी, फत्तेसिंग पाडवी, अफसर खान उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.