नंदुरबारात घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस

नंदुरबारात घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस
Published on: 
नंदुरबारात घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस --- दोन अल्पवयीन बालकांसह दोघे ताब्यात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : शहरासह नवापूर व अक्कलकुवा येथील घरफोडी प्रकरणात दोन संशयितांसह दोन अल्पवयीन बालकांसह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. शहरातील स्वामी समर्थनगरातील घरफोडीचा गुन्हा परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर व त्याचा पुतण्या राजसिंग लखनसिंग शिकलीकर (दोन्ही रा. म्हाडा कॉलनी, एकतानगर, नंदुरबार) यांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने करकुपा चौकात सापळा लावून एक अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्याने परबतसिंग शिकलीकर याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उर्वरित चांदीचे दागिने व साड्या परबतसिंग शिकलीकर याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे अक्कलकुवा येथील शितपेय निर्मितीच्या गुदामात झालेल्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवी अनिल पाडवी (वय २७), मंगलसिंग दशरथ पाडवी (वय २५, दोन्ही रा. सोरापाडा- डाबरा, ता. अक्कलकुवा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नवापूर येथील घरातील चोरीप्रकरणी एका अल्पवयीन बालकाला नवापूर बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दोन अल्पवयीन बालकासह चौघांना ताब्यात घेऊन एकूण एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक महेश निकम व उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार दिनेश चित्ते, जितेंद्र तांबोळी, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, दादाभाई मासूळ, मोहन ढमढेरे, पोलिस नाईक चेतन साळवे, राहुल बोराळे, अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, राहुल पांढारकर, भरत उगले, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, अंमलदार रोहिणी धनगर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.