फोटो : NSK26H32999
नंदुरबार : बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना शंकर किरवे, गणेश देवरे, प्रा. अश्वमेघराज खोंडे, शोभराज खोंडे आदी.
-------------
खेळाडू भारताचे उज्ज्वल भविष्य
शंकर किरवे : विभागीय शिष्यवृत्ती बुद्धिबळ स्पर्धेत ९२ खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २० : बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची विचारक्षमता, निर्णयक्षमता व एकाग्रता विकसित होण्यास मदत होते. खेळाडू हे भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांनी केले.
नंदुरबार जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटना व अखिल मराठी राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अश्वमेघराज चेस क्लबतर्फे नंदुरबार येथे आयोजित विभागीय शिष्यवृत्ती बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत एकूण ९२ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक प्रशासकीय अधिकारी गणेश देवरे, कृषी महाविद्यालयाचे प्रा. अश्वमेघराज खोंडे, संघटनेचे सचिव शोभराज खोंडे आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये मुख्य गटासाठी रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. विविध वयोगटांतील विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्हे देण्यात आली. प्रत्येक संबंधित गटातील प्रथम तीन खेळाडूंना शिष्यवृत्ती व्हाउचर प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आरटी हॉस्पिटलच्या संचालिका प्राची अग्रवाल, प्रा. पौर्णिमा पाटील, प्रा. पल्लवी बारी, नंदनी सोनगरे, वर्षा खोंडे, प्रशिक्षक मेघा खोंडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माधुरी बोरगावकर, वैष्णवी महाजन, प्रणव सूर्यवंशी, विनीत बागूल, सागर महाजन व अंकित वळवी यांनी परिश्रम घेतले. संतोष शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. निलेश गावंडे यांनी आभार मानले.
खुल्या गटात प्रथम क्रमांक वैभव बोरसे, द्वितीय क्रमांक ऋषिकेश सोनार, तृतीय क्रमांक आकाश गवळे याने पटकावला. सात वर्षाच्या आतील गटात प्रथम क्रमांक क्रिशिव शहा, द्वितीय जीवांश चव्हाण, तृतीय स्वराज खोंडे, नऊ वर्षातील गटात प्रथम क्रमांक विराज जोंधळे, द्वितीय प्रज्वल पाटील, तृतीय लोकेश पाटील, ११ वर्षाच्या आतील गटात प्रथम क्रमांक जय अग्रवाल, द्वितीय हार्दिक पाटील, तृतीय शौर्य जाधव, १३ वर्षातील गटात प्रथम क्रमांक अंशिका भालेराव, द्वितीय देवांग पवार, तृतीय क्रमांक क्रियांश चौधरी, १५ वर्षातील गटात प्रथम क्रमांक समीर यादव, द्वितीय करूणेश चौधरी, तृतीय क्रमांक साक्षी चव्हाण यांनी पटकावला.