फेसमध्ये चिकनगुनियासदृश्‍य आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ

फेसमध्ये चिकनगुनियासदृश्‍य आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ
Published on: 
सेकंड मेन फोटो : 35329 नंदुरबार : रुग्णांचे रक्तनमुने घेताना आरोग्य कर्मचारी. ----------- फेसमध्ये चिकनगुनियासदृश रुग्णसंख्येत वाढ नऊ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत वडाळी, ता. १८ : ताप, सांधेदुखी, अंगदुखी यामुळे फेस (ता. शहादा) येथील वाल्मीक चौक परिसरातील रुग्ण त्रस्त आहेत. गावात चिकनगुनियासदृश आजाराच्या रुग्णसंख्येन सतत वाढ होत आहे. या पार्श्र्वभूमीवर आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, प्रत्येक घरांचा सर्व्हे केला जात आहे. रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून फेस येथील वाल्मीक चौक व आदिवासी वस्तीतील ३० ते ४० जणांना ताप, सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास होत होता. यातील काही जणांनी वडाळीसह शहादा, दोडाईचा येथील खासगी दवाखान्यांत उपचार केले. काहींनी वडाळी येथील आरोग्य केंद्रात उपचार केले. रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य पथकांच्या माध्यमातून ४ नोव्हेबरला कंटेनर सर्वेक्षण सुरू केला होते. बुधवारी नऊ रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. सध्या गावांत सहा आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. फेससह परिसरातील गावांतील रुग्णांना वेळेवर उपचार व्हावेत म्हणून उपकेंद्र आहे. त्यात सामुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका, आशासेविका उपलब्ध आहेत. तरीही बहुसंख्य रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ........ कोट---- गावातील ४९० पैकी १२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरू आहे. यात लक्षणे असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने घेतले जात आहेत. तपासणीसाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या प्राथमिक स्वरूपात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - डॉ. नारायण बावा, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.