‘सेवा सप्ताह’ काळात लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

‘सेवा सप्ताह’ काळात लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ
Published on: 
पान-१ मेन फोटो : 31264 नंदुरबार : शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविताना चंद्रकांत रघुवंशी. शेजारी राहुल वाघ, प्रीतम ढंडोरे, गणेश गावित, युवराज चव्हाण, सागर साळुंके. ........... फोटो : 31265 नंदुरबार : श्रमदान करताना प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार. शेजारी देवेंद्र पाटील, योगेश बागल, सुदर्शन पावरा, कौशल्या पाडवी डी. एच. माळी आदी. ‘सेवा सप्ताह’तून नगर परिषदेचा स्वच्छतेचा संदेश आमदार रघुवंशींसह मुख्याधिकाऱ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम नंदुरबार, ता. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सहकार्य केले. मोहिमेंतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक या मुख्य मार्गासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी, ‘बीपीसीएल’चे अधिकारी व कर्मचारी तसेच परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. उपस्थितांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. या वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मुख्याधिकारी राहुल वाघ, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, शहर अभियंता गणेश गावित, आरोग्य विभागप्रमुख युवराज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक सागर साळुंके यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देत स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी नागरिकांनीही मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ---------------------- आदिवासी प्रकल्प कार्यालयात श्रमदान नंदुरबार : सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत स्वच्छता मोहीम राबविली. प्रकल्प अधिकारी डॉ. पवार यांनी स्वच्छता एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे सांगितले. सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, योगेश बागल, लेखाधिकारी सुदर्शन पावरा, नियोजन अधिकारी श्री. देवरे, कार्यालय अधीक्षिका कौशल्या पाडवी, विस्तार अधिकारी डी. एच. माळी उपस्थित होते. अभियानांतर्गत झालेल्या स्वच्छता मोहिमेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com