काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
नंदुरबार : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नंदुरबार जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली असून, यात दोन वरिष्ठ उपाध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, सात सचिव आणि ११ सदस्यांचा समावेश आहे
जिल्हाध्यक्ष दीपक पटेल यांनी प्रदेशाध्यक्षांकडे जिल्हा कार्यकारिणीसाठी ३४ जणांची यादी पाठविली होती.
कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्षपदी राया मावची, विक्रम पाडवी, उपाध्यक्षपदी सी. के. पाडवी, राजेंद्र पाटील, लाल मोहम्मद अल्ला रखा बलोच, जितेंद्र पाडवी, रोहीदास पाडवी, सरचिटणीसपदी आर. सी. गावित, किशोर पाटील, सोहेलभाई बलेसरिया, सचिवपदी बिज्या वसावे, विजयसिंग वसावे, वसीम शे. वाहेद, शिवाजी पावरा, विश्वनाथ वळवी, संतोषकुमार गवळी, जगन वळवी, कार्यकारिणी सदस्यपदी निर्मला राऊत, सुमन वळवी, मनीषा पाडवी, आशिष मावची, खंडेराव पवार, सुनील पाडवी, नरहर ठाकरे, मान्या पावरा, डॉ. योगेश पावरा, गोपीचंद पावरा, गजानन वसावे, किरसिंग जोरदार वसावे, गोवर्धन ठाकरे, सत्येन वळवी, ॲड. गीता पाडवी, ऋतुजा गावित, रोशनी ईशी, रंजना नाईक यांच्यासह निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाचे आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माजी मंत्री, माजी आमदार, खासदार, प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, आघाडी-संघटनांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष यांचा समावेश आहे.