नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर
Published on: 
फोटो : NSK26H34655 (विजयकुमार गावित) ---------- विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची नंदुरबारकरांना दिवाळी भेट सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ६ : आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रस्तावित केलेल्या नंदुरबार शहराच्या विविध वसाहतींमधील २३ विकासकामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे विविध प्रभागातील कामांना चालना मिळणार असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला आहे. नगरविकास विभागाच्या शासन निर्णयात म्हटले आहे की, ‘नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला पाच कोटींचा निधी शासन निर्णयान्वये मंजूर केला आहे. सदर प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. कामाची कार्यान्वयीन यंत्रणा सर्वजनिक बांधकाम विभाग राहील, असेही आदेशात म्हटले आहे. आमदार डॉ. गावित यांनी मिळवून दिलेल्या या निधीमुळे नंदुरबार शहरातील विविध वसाहतींमधील सोयीसुविधा आणि विकास कामे पूर्णत्वास येणार आहेत. नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील व्यायाम शाळा बांधकाम करणे, नगर परिषदेच्या सभामंडपाचे बाधकाम करणे, शाळेचे गार्डन विकसीत करणे, सामाजिक सभागृह विकसीत करणे, नगर परिषदेचे सामाजिक सभागृह (डोम) बांधकाम करणे, मंदिराचे सभामंडप बांधणे, यासारख्या २३ कामांचा यात समावेश आहे. शहराला भरघोस निधी मिळाल्याने आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित भाजपा नगरसेवकांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.