दिपोत्सवाला नंदुरबारची बाजारपेठ फुलली

दिपोत्सवाला नंदुरबारची बाजारपेठ फुलली
Published on: 
(पान १ ला मेन) फोटो : NSK26H34718 नंदुरबार : पणत्यांची खरेदी करताना. फोटो : NSK26H34717 नंदुरबार : झेंडू फुलांची खरेदी करताना. -------------------- दीपोत्सवाला नंदुरबारची बाजारपेठ फुलली वाहने, दागिन्यांच्या खरेदी- विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : दीपावलीनिमित्त जिल्ह्याच्या बाजारपेठेत झळाळी आली असून, विविध वस्तूंच्या खरेदी- विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. सराफ बाजारासह घरगुती इलेक्ट्रानिक्स वस्तू, वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यावर यंदा दुष्काळाची छाया असली तरी दीपावलीला बाजारपेठ सजली आहे. ------- दुष्काळामुळे दिवाळीत उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, हा अंदाज फोल ठरला असून, धनत्रयोदशीपासून बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे. विशेष करून नंदुरबार शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, किराणा साहित्य, फराळ, मातीच्या मूर्ती, दिवे पणत्या, घरगुती वस्तू, कपडे, इलेक्ट्रानिक्स वस्तूंसह विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी, शास्त्री मार्केट परिसरात धनत्रयोदशीला ग्रामीण भागातील नागरिकांची कपडे व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत वर्दळ होती. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने शहरात मोठ्या संख्येने रस्त्यांच्या बाजूने आणि मोकळ्या जागेत उभी असल्याचे दिसून आले. दुपारनंतर खरेदीसाठी गर्दी वाढत असते. मात्र, यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत होते. बाजारातील वाढती गर्दी पाहता या दिवाळीत चांगली उलाढाल होण्याची आशा व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने- चांदीचे दर सातत्याने खाली येत असल्याचे दिसत होते. मात्र, दिवाळीचे पर्व सुरू होताच सोने- चांदीच्या दरात वाढ झाली. दरात झालेली वाढ त्यात दुष्काळी स्थिती यामुळे दागिन्यांच्या खरेदीला सुरूवातीला प्रतिसाद कमी मिळाला. मात्र, धनत्रयोदशीला नंदुरबारच्या सराफा बाजारात झळाळी दिसून आली. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत वर्दळ नंदुरबार शहरातील गांधी पुतळा, हाट दरवाजा, नेहरू चौकातील फटाका बाजार तसेच सतत गजबज असलेल्या मंगळ बाजारात खरेदीदारांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ होती. यंदाच्या दिवाळीत व्यवसायाला चालना मिळाल्याने व्यापारी वर्गात समाधान दिसून आले. दिवाळीच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागाकडे १५० च्या आसपास चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे १०० पेक्षा अधिक ट्रॅक्टर तर ४०० पेक्षा अधिक दुचाकी वाहनांची नोंदणी प्रक्रीया सुरू आहे. वाहनांच्या खरेदीविक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे. पणत्या, आकाश कंदीलला मागणी दीपोत्सवात सर्वत्र पणत्यांचा लखलखाट दिसत असतो. दीपपर्वात प्रत्येक घरावर पणत्यांची माळ पेटलेली दिसते. मातीच्या पणत्यांना यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. विविध आकाराच्या नक्षीकाम केलेल्या मातीच्या पणत्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदीलांच्या प्रकाशाने वास्तुची शोभा वाढविली जात आहे. फुलांच्या माळा बनविण्यासाठी व सजावटीसाठी झेंडूची फुले तसेच रांगोळी पावडरची मागणी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.