विनोबा ॲपच्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारांचे वितरण

विनोबा ॲपच्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारांचे वितरण
Published on: 
NSK26H34667 नंदुरबार : शिक्षकांचा गौरव करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल. --- विनोबा ॲपवरील चार शिक्षकांचा गौरव ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारांचे वितरण; सन्मानपत्रासह शैक्षणिक साहित्य किट प्रदान सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ९ : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत नावीन्यपूर्ण बदल घडवून आणणे आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम करणे, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रमांतर्गत विनोबा ॲपच्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याहस्ते, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड यांच्या उपस्थितीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य किट देऊन गौरविण्यात आले. या वेळी विनोबा ॲपचे जिल्हा प्रोजेक्ट ऑफिसर यश पांडे उपस्थित होते. पुरस्कारासाठी विशाल दिलीप पाटील (अजेपूर), गोपाल होनजी गावित (प्रकाशा), वृषाली राजू साळवे (भालेर), सोनाली रवींद्र पाटील (नारायणपूर) यांचा पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये समावेश आहे. या शिक्षकांनी विनोबा ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम, अध्यापन साहित्य आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक कृतींचे प्रभावी सादरीकरण केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण अधिक आनंददायी, कृतिशील आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेने पुणे येथील ओपन लिंक्स फाउंडेशनच्या सहकार्याने ‘विनोबा’ मोबाईल ॲप उपलब्ध केले आहे. विनोबा ॲप शिक्षकांसाठी उपयुक्त डिजिटल व्यासपीठ ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना एकमेकांशी ऑनलाइन संवाद साधता येतो. अध्यापनातील विविध प्रयोग, नावीन्यपूर्ण शैक्षणिक कृती, अध्ययन-अध्यापन साहित्य, शैक्षणिक व्हिडिओ आणि यशस्वी उपक्रम अपलोड करता येतात. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विनोबा ॲपचे महत्त्व सांगितले. आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न व प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यासाठीही हे व्यासपीठ सहाय्यभूत ठरणार असल्याचे ते म्हणाले. धनश्री पाटील या विद्यार्थिनीने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याविषयी भाषण सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.