दुष्काळी मदत मिळण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा आंदोलनाचा इशारा

दुष्काळी मदत मिळण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा आंदोलनाचा इशारा
Published on: 
(पान ३ ला मेन) फोटो : NSK26H31574 नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना सत्यशोधक कष्टकरी सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते --------------- शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळी मदत करा सत्यशोधक शेतकरी सभेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : वनपट्टेधारक व प्रलंबित वनहक्क दावेदारांसह सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळी मदत व पीक नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. २१ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महसूल विभागाने वनहक्क दाव्यांची कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामस्तरापासून उपविभागीय व जिल्हास्तरीय समित्यांकडील प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत, पात्र दावेदारांना वनहक्क द्यावा तसेच मंजूर वनहक्कधारकांना ७ ई/१२ ई अभिलेख व वनपट्टे देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या दुष्काळी पीक नुकसान पंचनाम्यांमध्ये वनपट्टेधारक, वनहक्क दावे प्रलंबित असलेल्या प्रत्यक्ष शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांची पिके वगळली जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली. केवळ फार्मर आयडी उपलब्ध नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे पात्र शेतकरी व वनहक्क दावेदारांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवू नये, वनहक्क जमीन असल्याच्या कारणाने कोणत्याही शेतकऱ्याच्या उभ्या पिकांचे पंचनामे नाकारू नयेत. तसेच, ग्रामपंचायतनिहाय वनपट्टेधारक व प्रलंबित वनहक्क दावेदारांची यादी तयार करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर वनहक्क दावेदार, शेतकरी व कष्टकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी आर. टी. गावित, शीतल गावित, दिलीप गावित, विक्रम गावित, जालमसिंग गावित, राजेश गावित, उत्तम गावित, सेल्या गावित, रामदास गावित, गोबजी गावित, सुरेखाबाई पाडवी, मनिला गावित, सुनील गावित, राजू गावित, नवलसिंग गावित, प्रभाकर गावित यांच्यासह सत्यशोधक शेतकरी सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com