33487
नंदुरबार : येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात घरकुलांसाठी बालकांच्या हस्ते सोडत काढताना आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, प्रथमेश चौधरी, प्रांताधिकारी बी.ए.कापसे, मुख्याधिकारी राहुल वाघ.
-------------
नंदूरबारला २५३ पात्र
कुटुंबांना घरकुलांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : नगरपरिषदेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ''बेघरांसाठी घरे'' या घटकातून २५३ पात्र कुटुंबांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. शनिवारी (ता.२४) श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात यासाठी जाहीर सोडत काढून एकुण ७११ पात्र लाभार्थ्यांमधून २५३ कुटुंबांना घरकुलांच वाटप करण्यात आले. सोडत प्रक्रियेसाठी प्रेम ठाकरे, वैशाली भील, टीना ठाकरे आणि राधिका पाडवी या चिमुकल्या मुलींच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या.
शासन नियमानुसार १५ हजार रुपये भरलेले ५८ पात्र लाभार्थ्यांना घरकुलांसाठी प्राधान्य देत प्रथम सोडत काढण्यात आली. त्यानंतर उर्वरित १९५ घरकुलांसाठी ६५३ पात्र लाभार्थ्यांमधून निवड झाली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रांताधिकारी बी.ए.कापसे उपस्थित होते.
घरकुलांच्य लाभार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी नगरपरिषदेने मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. तसेच यावेळी सोडतीचे चित्रीकरण करण्यात आले.