जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत
Published on: 
31141 नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी. ---------------------- जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : जिल्ह्यात विविध भागांमध्ये अवैधरीत्या दारूविक्री, जुगार, मटका, अमली पदार्थाची विक्री, नकली दारू, ताडी निर्मिती व विक्री आदी व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप करत याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावे, अशा मागणीचे भाजपतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधिक्षक अश्‍विनी सानप यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. सीमावर्ती भाग असल्याने याठिकाणी अवैध दारू व अमली पदार्थ यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. यामुळे नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातील अवैध धंद्याचे केंद्र बनत आहे. यातून शहरात गुन्हेगारी वाढत असून नुकतीच गोळीबाराची घटना घडलेली आहे. त्यामुळे नंदुरबार शहर जिल्ह्यातील संबंधित विभागामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास भाजपातर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी ॲड. सत्यानंद गावित, मोहन खानवानी. पंकज पाठक, डॉ. समिधा नटावदकर, कैलास चौधरी, डॉ. सपना अग्रवाल, पद्मा परदेशी, दिलीप वळवी, सुदाम चौधरी, छोटू चौधरी, राजेश पाडवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com