मराठी भाषा विभागातर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

मराठी भाषा विभागातर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन
Published on: 
(टुडे पान एक ॲनकर करावी) फोटो : NSK26H32996 (लोगो) ----------- नंदुरबारात शनिवारी जिल्हास्तरीय साहित्य संमेलन नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्थेच्या पुढाकारातून आयोजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १९ : मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २४) सकाळी दहाला बाबा रिसॉर्ट येथील आपश्री गुलाम महाराज सभागृहात जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेआठ वाजता गिरीविाहर गेट ते बाबा रिसॉर्टपर्यंत साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनाचे उद्‌घाटन लोकशहीर कॉ. संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आत्माराम इंधवे उपस्थित राहतील. ज्येष्ठ साहित्यीक वाहरू सोनवणे अध्यक्षस्थानी राहतील. ज्येष्ठ साहित्यिका नजूबाई गावित, दिनानाथ मनोहर यांच्यासह खासदार गोवाल पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, एरंडोल पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य आशुतोष पाटील, प्रकाश होळकर, नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल शिरसाठ, साहित्यिक रमाकांत पाटील यांची उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. परिसंवाद व कवीसंमेलन दुपारी १२ वाजता मराठी साहित्याला आदिवासी साहित्यीकांचे योगदान या विषयावर परिसंवाद होईल. या वेळी डॉ. आशुतोष पाटील अध्यक्षस्थानी राहणार असून, परिसंवादात सचिन गरूड, संतोष पावरा, कमलेश बेडसे सहभागी होणार आहेत. दुपारी दीडला कवी चामुलाल राठवा कवी संमेलन होईल. अध्यक्षस्थानी प्रकाश होळकर राहतील. संमेलनात विशाल जाधव, विशाखा सावतकर, सुभाष वळवी, संतोष पावरा, दत्तात्रय ढिवरे, कमलेश महाले, भास्कर धनगर, लक्ष्मण पावरा, संदीप निकम, प्रा. सुनील पिंपळे, दिलीप लोखंडे, अमित तिखाडे, प्रवीण पानपाटील हे कवी सहभागी होणार आहेत. दुपारी २.४५ वाजता नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चळवळ आणि साहित्य या विषयावर मान्यवरांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ साहित्यीक वाहरूभाऊ सोनवणे, नजुबाई गावित आणि दिनानाथ मनोहर यांची मुलाखत कमलेश बेडसे, अमोल पगारे, संदीप देवरे हे घेतील. सायंकाळी ४.१५ ला समारोप समारंभ व पारितोषीक वितरण सोहळा होईल. या वेळी आदिवासी विद्रोह आणि आदिवासींचे बदलते राजीकय भान या विषयावर चर्चा होईल. डॉ. अनिल शिरसाठ हे अध्यक्षस्थानी राहणार असून डॉ. उमेश बगाडे आणि डॉ. राजेश वळवी यांची प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहे. या वेळी राहुल वाघ, अमोल वाघ, डॉ. बी. बी. शेंडे यांची विशेष उपस्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com