

Nandurbar MBBS Student
esakal
नंदुरबार : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री गांधीनगर कॉलनीत घडली. मयंक पंड्या असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून, तो राजस्थानमधील रहिवासी आहे. परीक्षेच्या एक दिवसापूर्वीच मयंकने जीवनयात्रा संपविली.