''जल्लोष लोककलेचा'' स्पर्धेत होळतर्फे हवेलीच्या शासकीय निवासी शाळेस सर्वोत्कृष्ट पारितोषिक

''जल्लोष लोककलेचा'' स्पर्धेत होळतर्फे हवेलीच्या शासकीय निवासी शाळेस सर्वोत्कृष्ट पारितोषिक
Published on: 
(पान एक ॲन्कर) फोटो : NSK26H31354 नंदुरबार : महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या शासकीय निवासी शाळेचा संघ. ------------------- ‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत शासकीय निवासी शाळा ‘सर्वोत्कृष्ट’ लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : बालरंगभूमी परिषद आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेची महाअंतिम फेरी लातूर येथे पार पडली. या महाअंतिम फेरीत राज्यभरातील एकूण २१ जिल्ह्यातील बालकलावंतांनी समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल वादन व एकल नृत्य या विविध गटात सहभाग नोंदवला होता. पैकी समूहनृत्य गटात नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले. लावणीसम्राज्ञी व महाराष्ट्र लोककला महासंघाच्या अध्यक्षा सुरेखा पुणेकर, गायक मंगेश बोरगावकर यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के- सामंत यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, सहकार्यवाह दीपाली शेळके, आसेफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर, त्र्यंबक वडस्कर, शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, निमंत्रित सदस्य संजय रहाटे, देविप्रसाद सोहनी, बाळकृष्ण ओडेकर, प्रमुख सल्लागार गोविंद गोडबोले, अरुण पटवर्धन, संजय पाटील देवलाणकर व बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बालरंगभूमी परिषद आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्‌घाटन ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, गायक अभिजित कोसंबी व बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के- सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. या सर्वोत्कृष्ट लोकनृत्याच्या समूहात प्रज्ञा बच्छाव, भूमिका गवळे, जीविका पवार, प्रियंका पवार, नीलम वसावे, रविना कोकणी, मनीषा पाडवी, स्वाती आखाडे, मृणाली कोळी, सोनल शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश होता. या नृत्याचे नृत्यदिग्दर्शन अधिक्षीका सुषमा मोरे यांनी केले. समाजकल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, मुख्याध्यापिका रेखा चौधरी, अनिता बागूल, अभिमान गावित, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नागसेन पेंढारकर, कार्याध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह राजेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ कलावंतांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com