NSK26H31523
नंदुरबार : विज्ञान शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करताना मान्यवर.
----
विज्ञानाच्या प्रयोगातून संकल्पना स्पष्ट करण्यावर भर
विज्ञान शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ६ : विज्ञान परिषद, मुंबई आणि नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यकांची नुकतीच प्रशिक्षण दोन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात आले.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा माजी प्राचार्य डॉ. एम. एस. रघुवंशी व जी. टी. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विज्ञान परिषदेच्या नंदुरबार शाखेचे अध्यक्ष बी. एस. पाटील होते. या वेळी प्राचार्य डॉ. कैलास चौधरी, निलेश सोमाणी, विज्ञान परिषदेचे राजेश समेळ, शुभदा वक्ते, विज्ञान अधिकारी सचिंद्र वानखेडे, सौरऊर्जा तज्ज्ञ अभय यावलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी प्रयोगांद्वारे विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची गरज व्यक्त केली. बी. एस. पाटील यांनी कार्यशाळेमुळे शिक्षकांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी नीलेश सोमाणी प्रा. डॉ. नंदा वसावे, प्रा. रवींद्र वळवी व प्रा. स्नेहल अग्रवाल यांनी प्रयत्न केले.