तायक्वांदो खेळासाठी सर्वतोपरी मदत करणार

तायक्वांदो खेळासाठी सर्वतोपरी मदत करणार
Published on: 
फोटो : NSK26H32867 नंदुरबार : तायक्वांदो खेळाडूंच्या गौरव सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमदार चंद्रकांत रघुवंशी समवेत नगरसेवक परवेज खान, कुणाल वसावे आदी. -------------- तायक्वांदो खेळासाठी साहित्य देणार आमदार रघुवंशी : खेळाडूंना बक्षिस वितरण सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबतच खेळही खूप महत्त्वाचा आहे. तायक्वांदो खेळातून उत्कृष्ठ खेळाडू घडतील. ते आपल्या जिल्ह्याचे नाव लौकीक करतील, असा विश्‍वास आहे. तायक्वांदो खेळासाठी लागणारे क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्‍वासन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले. येथील नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे आयोजित पदक वितरण व पुरस्कार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे राज्य, विभाग व जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून पदके जिंकणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक परवेज खान, कुणाल वसावे, शितलकुमार पटेल, चेतन वळवी, फारुख मेमन, मुख्याध्यापक शेख साबीर, राहुल खैरनार, जसवंत परदेशी, हाजी हमीद धोबी, हाजी वाहब कुरेशी, हाजी मुस्लिम कुरेशी, जाकीर रंगरेज, पिंजारी जहुर, सैय्यद इम्रान, काझी जाकीर आदी उपस्थित होते. शितलकुमार पटेल यांनी खेळाडूंसाठी स्मृतीचिन्ह व पदक उपलब्ध करुन दिले. या वेळी खेळाडूंनी तायक्वांदो खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. राज्यस्तरीय पदकप्राप्त जुहा जावेद बागवान व हरमाईन आसिफ खान तसेच राज्यस्तरीय खेळाडू माज इब्राहीम अन्सारी यांना स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तायक्वांदो खेळाडू आलिया आसिफ खान ही भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा तायक्वांदो प्रशिक्षक जावेद बागवानी यांनी केले. हैदर जाफर यांनी सूत्रसंचालन केले. शेख खलील धोबी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख रहीम धोबी, अरशद कुरेशी, सुफियान काझी, शाहीद सैय्यद, हमजा मन्सुरी, फरहान कादरी आदींनी परिश्रम घेतले.
Marathi News Esakal
www.esakal.com