फोटो : NSK26H34684
नंदुरबार : किराणा होलसेल रिटर्न व्यापारी संस्थेच्या व्यापारी भवनाचे भूमिपूजन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी समवेत नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी.
------------
नंदुरबारला व्यापारी भवनाचे भूमिपूजन
किराणा होलसेल रिटर्न व्यापारी संस्थेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : येथील नियोजित नंदुरबार किराणा होलसेल रिटर्न व्यापारी संस्थेच्या व्यापारी भवनाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील मोहननगरमधील नगरपालिकेच्या इंडस्ट्रियल खुल्या जागेवर हे व्यापारी भवन उभारण्यात येत आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्याकडे मागणी केली होती. याबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भवनासाठी खुली जागा नगर पालिका देईल. मात्र, त्या जागेवर व्यापारी संस्थेने स्वखर्चाने बांधकाम करावे. व्यापाऱ्यांना आम्ही सहकार्य करू. कायदेशीर पद्धतीने जेवढी जागा आपल्याला दिली जाईल, तेवढेच बांधकाम करावे. नगरपालिकेकडे बांधकामाचा नकाशा सादर करावा. नकाशानुसार नगरपालिकेतर्फे बांधकामाची मंजुरी प्रत मिळेल. त्यानंतर बांधकाम पूर्ण करावे. ही जागा तीस वर्ष कराराने देण्यात येत आहे. त्यानंतर पुढे दोनवेळा कराराला मुदतवाढ दिली जाईल. म्हणजे एकूण ९० वर्षाचा हा करार असेल. दर तीस वर्षांनी कराराचे नूतनीकरण करावे. आम्ही शहरातील तीन जागांना परवानगी दिली आहे. त्यात सिंधी बांधवांना तसेच एक अध्यात्म केंद्रासाठी देखील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. परवानगी मिळाल्याशिवाय बांधकामाची घाई करू नये, असेही आमदार रघुवंशी म्हणाले.
या वेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या. बांधकाम सभापती देवेंद्र जैन, नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक कमल ठाकूर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रूपचंद जैन, उपाध्यक्ष महेंद्र जैन व्यासपीठावर उपस्थित होते. व्यापारी संघटनेचे संतोष जैन, गजेंद्र शिंपी, कार्तिक दोशी, धीरजकुमार जैन, सुरेशकुमार जामनाणी, सुनील जैन यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संतोष जैन यांनी सूत्रसंचालन केले.