कृषी विज्ञान केंद्रातर्फे रोपवाटीका प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्रातर्फे रोपवाटीका प्रशिक्षण
Published on: 
फोटो : NSK26H34207 नंदुरबार : प्रो- ट्रे तंत्रज्ञानाद्वारे भाजीपाला रोपवाटिका निर्मितीसाठी व्हॅक्यूम सीडर यंत्राचा वापर व हाताळणीचे प्रात्यक्षिक घेताना प्रशिक्षणार्थी शेतकरी. ------------ कृषी विज्ञान केंद्रातर्फे रोपवाटीका प्रशिक्षण दर्जेदार भाजीपाला रोपे उपलब्ध होण्यासाठी पुढाकार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : तालुक्यातील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘प्रोट्रे तंत्रज्ञानातून भाजीपाला रोपवाटिका निर्मिती’ विषयावर प्रशिक्षण उपक्रम पार पडला. यात ३० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी लागणाऱ्या ६० टक्क्यांहून अधिक रोपांचा पुरवठा नाशिक जिल्हा तसेच गुजरात सीमेलगतच्या भागातील रोपवाटिकांमधून केला जातो. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना रोपांच्या खरेदीसाठी अधिक किंमत मोजावी लागते. लांब अंतरावरून रोपांची वाहतूक करताना अतिरिक्त खर्च येतो. तसेच, रोपांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे जिल्ह्यात शास्त्रीय पद्धतीने भाजीपाला रोपवाटिका उद्योजकांची संख्या वाढावी, स्थानिक पातळीवर दर्जेदार रोपे उपलब्ध व्हावीत आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात रोपांचा पुरवठा व्हावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान नाशिक येथील ओम गायत्री नर्सरी तसेच नाशिक कृषी विज्ञान केंद्रातील रोपवाटिका येथे अभ्यासभेट झाली. समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निझर येथील दीप नर्सरीचे संचालक महेश पटेल होते. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे होते. या वेळी गृहविज्ञान शास्त्रज्ञ आरती देशमुख, शिवाजी परमार, राजेश भावसार आणि संदीप कुंवर उपस्थित होते. प्रशिक्षणाचे समन्वयक कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. वैभव गुर्वे यांनी विविध सैद्धांतिक व प्रात्यक्षिक उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्र दहातोंडे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रोपवाटिका व्यवसायातील संधींवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात भाजीपाला रोपांची मोठी मागणी आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार रोपांची निर्मिती केल्यास युवक व शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. महेश पटेल यांनी रोपवाटिका व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. राजेश भावसार यांनी सूत्रसंचालन केले. संदीप कुंवर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.