एप्रिल २०१५. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावरील एका पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळून आला. साधारण ३५ वर्षांची ती महिला. डोक्याला गंभीर माराचे घाव, गळ्याला आवळल्याच्या खुणा. सुरुवातीला पोलिसांना शंका होती. पुलावरून पडून मृत्यू झाला की खून झाला?