नारोशंकराची घंटा : काही प्रोटोकॉल आहे की नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

News Bite

नारोशंकराची घंटा : काही प्रोटोकॉल आहे की नाही?

समारंभात सभेसमोर माईक पकडायची अन्‌ प्रसार माध्यमांसमोर उभे राहिल्‍यावर बाईट (प्रतिक्रिया) देण्यासाठी काही काहींना भलतीच हौस असते. त्‍यात संधी मिळाली नाही तर नाराजी अन्‌ त्‍यातून होणारे विनोदी किस्से खिदखिदवून हसवितात.

नुकतेच एक राज्‍यस्‍तरीय अधिवेशन नाशिकच्‍या तपोवन परिसरातील सभागृहात पार पडले. (naroshankarachi ghanta sakal special comedy on protocol nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सर्व ज्‍येष्ठ श्रेष्ठ या अधिवेशनास उपस्‍थित होते. दिवसभराचा कार्यक्रम असल्‍याने तेथे उपस्‍थितीत काही लोकल न्यूज चॅनलच्‍या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांना बाईट (प्रतिक्रिया) देण्यासाठी बाहेर बोलविले.

आता राज्‍यस्‍तरीय समारंभ म्‍हटला तर नेत्‍यांची फौजच उपस्‍थित असेल, यात शंका नाही. पहिल्‍या पदाधिकाऱ्याने मनोगत व्‍यक्‍त केले, दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, तिसराही बोलला. राहून राहून उपस्‍थित घोळक्‍यातील एक जण भलताच भडकला.

'काही प्रोटोकॉल आहे की नाही.. मी अध्यक्ष आहे, आणि माझी सोडून तुम्‍ही सर्वांचीच बाईट घेतली.' असे खडेबोल प्रतिनिधींना सुनावले. तर पदाधिकाऱ्याकडे बघत सदगृहस्‍थ म्‍हणाले, 'मान्‍य आहे तुमच्‍या ओळखीचे आहेत, मग लगेच उभे राहून प्रतिक्रिया द्यायची का? पदाधिकारी म्‍हणून आम्‍हाला काही मान आहे की नाही?' असे म्‍हणताच उपस्‍थितांना हसू काही आवरे ना.

पण पुन्‍हा पदाधिकारी महोदय चिडतील म्‍हणून उपस्‍थितांनी कसेबसे हसू आवले. अन्‌ उपस्‍थित प्रतिनिधींनीही संबंधित पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अखेर प्रतिक्रिया घेतलीच. समारंभानंतर हा विनोदी किस्सा अनेकांना खिदखिदवून हसविणारा ठरला.

टॅग्स :NashikSakalComedy