नारोशंकराची घंटा

naroshankarachi  ghanta
naroshankarachi ghantaesakal

मैत्रीची अशीही उतरण...

सार्वजनिक जीवनात कोण कोणाचा दुश्मन असेल याची खात्री देता येत नाही. वरकरणी मित्रत्वाचा भाव आणणारे शेवटच्या क्षणी कसे पलटी मारतात याचे उदाहरण एका हाणामारीच्या प्रसंगातून समोर आले.

चार मित्र महात्मा गांधी रस्त्याने जात असताना यातील एकाला पोलिसांनी जुन्या कारणावरून दोन थोबाडीत मारल्या. थोबाडीत मारताना उरलेल्या तीन मित्रांनी त्रागा करत पोलिसांवर राग व्यक्त केला. पोलिस ठाण्यापर्यंत वाद गेल्यानंतर तडजोडीची भाषा सुरु झाली.

थोबाडीत मारलेल्या पोलिसाला वाटले, किती जिवलग मित्र आहे. जे मित्रासाठी पोलिस ठाण्यापर्यंत आले. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी प्रकरण मिटविले. परंतु वरिष्ठांपर्यंत प्रकरण पोहोचविण्यात आल्याने पोलिस वैतागले.

अखेरीस अधिक खोलवर शिरल्यानंतर मित्राच्या दोनऐवजी चार थोबाडीत का नाही मारल्या? याचाच राग त्या तीन मित्रांना आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी डोक्याला हात लावला. (Naroshankarachi Ghanta sakal special on friendship political omedy tragedy nashik news)

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : संपत्तीचे राजकीय वारस

अतिथींनाच मिळाला घरचा आहेर

लग्न सोहळा म्हटलं की, वधुवरांसह त्यांचे आप्तेष्ट आणि वऱ्हाडींची फार धावपळ असते. पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना काही कमी रहायला नको म्हणून छोट्या छोट्या गोष्टींची ते काळजी घेत असतात.

अशीच काहीशी अवस्था शासकीय कार्यक्रमांची असते. त्यांच्या आयोजनापासून ते प्रमुख अतिथींची वेळ घेण्यापर्यंचा शिवधनुष्य पेलताना अनेकांची भंबेरी उडते. तर झाले असे की, नाशिकमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि दि. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बॅंकांची मार्गदर्शनपर कार्यशाळेसाठी पुणे येथून सहकार आयुक्तांना बोलविण्यात आले.

प्रमुख अतिथींसह आयोजकही व्यासपीठावर विराजमान झाले. पण बघतो तर काय समोर अगदीच नगण्य प्रेक्षक, श्रोते उपस्थित होते. पाहुण्यांनी भाषणात ही सल बोलूनही दाखविली.

अतिथींचा भ्रमनिरास व्हायला नको म्हणून आयोजकांनी अतिथींच्या कानात एक गोष्ट सांगितली. आज शहरात खूप लग्न असल्यामुळे समोर श्रोत्यांची संख्या थोडी कमी असल्याचा अजब खुलासा केला हे ऐकून अतिथींनाच 'घरचा आहेर' दिला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : आमच्या संस्थेकडेही लक्ष असू द्या

नेता, अभिनेता आणि नशा

नेते आणि अभिनेत्यांनी कुठलीही फॅशन केली तर ती फार लोकप्रिय ठरते. अभिनेत्यांच्या केसांची, कपड्यांची स्टाइल तर अनेकजण मारतात. 'तेरे नाम', 'गजनी' ही त्याची उत्तम उदारहरणे सांगता येतील.

तर झाले असे की, एक मराठी अभिनेता आणि तोही मूळचा नाशिकचाच बरका, एका कार्यक्रमासाठी शहरात आला होता. तरुण, तरुणींना त्याचे फार आकर्षण वाटावे, असा तो आहे खरा पण, त्याचा आजचा 'लूक' फारच वेगळा दिसत होता.

अशा परिस्थितीत स्टेजवरील मान्यवरांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. आयोजकांना तर करणे भागच होते, तो भाग सोडा. पण समोर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला चांगलाच रंगला होता. अखेर हा अभिनेता बोलायला उभा राहताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण सगळे एमएच १५ बरका. आपली गोष्टच वेगळी आहे. नाशिकच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये उत्साह ठासून भरलाय त्यामुळे त्याला टाळ्या वाजवा असे म्हणण्याची आवश्यकता नसते. मीही याच मातीतला असल्यामुळे माझ्यामध्ये हा उत्साह आहेच की.

पण आज तुम्हाला वाटत असेल की इतका वेगळा कसा दिसतोय. काही नशा, बिशा करून आलोय की काय. पण प्रेक्षकहो तसे काही नाही, आज माझी तब्येत बरी नसतानाही तुमच्या प्रेमापोटी मी इथवर आल्याची कबुली त्याने दिल्यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला नसेल तरच नवल.

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : पिशवीतली प्रयोगशाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com