नारोशंकराची घंटा : अतिजलद म्हणजे नेमकं किती जलद...?

Bus Plate
Bus Plateesakal
Updated on

स्थळ : ठक्कर बाजार बस स्थानक (सि. बी. एस.), वेळ : न्याहारीची...

नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणजेच सि.बी.एस. येथे काही तरुण मंडळी आपल्या गंतव्यस्थानाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहात बसली होती. आता तरुण मंडळी म्हटल्यावर थोडंच शांत बसणार होते, त्यामागे शास्त्रीय कारण असं होत की त्यांना प्रवास लांबचा करायचा होता, म्हणून मोबाईलची बॅटरी डाऊन होऊ द्यायची नव्हती.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Bus Plate
Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!

पण त्यायोगे का होईना हे तरुण गप्पा गोष्टींमध्ये रंगले होते. तितक्यात त्यांच्या नजरेत पडली फलाटावर उभी एक बस. त्या बसचा मार्ग सांगणारी पाटी त्यांना आकर्षक वाटली कारण त्यावर ‘अतिजलद’ असे लिहिले होते.

मग काय यांना चर्चेला विषयच मिळाला... ‘अतिजलद म्हणजे नेमकं किती जलद धावत असेल ही बस...? आणि तिला तेव्हढ्या वेगात धावायला रस्ते आहेत का, अतिजलदगतिने जाण्याची तिची कंडिशन तरी आहे का...?’

अशा एक ना अनेक प्रश्‍नांवर या तरुणाईने बसच्या जलद गती प्रवासाची मर्यादा अन् तिच्या पुढील समस्यांचा अख्खा पाढा वाचून काढला...समाधान एकच मोबाईलच्या गर्तेत असलेली ही मुलं आज कुठल्यातरी विषयावर संवाद तरी साधत आहेत.

Bus Plate
NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com