
नारोशंकराची घंटा : भुजबळांच्या अनोख्या शुभेच्छा...
माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे मिस्कील स्वभावाचे आहेत हे सर्वच जाणून आहेत. गंगापूर रस्त्यावर रविवारी (ता.१९) प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना त्याची पुन्हा प्रचिती आली. (naroshankarachi ghanta Unique wishes of Bhujbal sakal special nashik news)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
भुजबळ भाषणात म्हणाले की, आज केव्हा कुठे कशी परिस्थिती येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्लास्टिक सर्जन हा महत्त्वाचा माणूस आहे. कुठे नाक कापले गेले किंवा कुणी स्वतःहून कापून घेतले तर असा माणूस कामात येईल.
कुणाचे काही कारणाने दात पडले तरी देखील या रुग्णालयात उपचार मिळू शकतील. सहसा रुग्णालयाच्या उद्घाटनाला आपले रुग्णालय भरपूर चालावे अशा शुभेच्छा देणे बरोबर नसते, कारण रुग्णालयात रुग्ण आनंदाने येत नसतात.
मात्र प्लास्टिक सर्जनकडे अनेकदा हौशी मंडळी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी येत असतात, त्यामुळे डॉ. बच्छाव यांचे रुग्णालय अशा रुग्णांनी हाऊसफुल्ल व्हावे आणि त्यांची भरभराट व्हावी अशा शुभेच्छा देण्यास हरकत नाही. भुजबळांच्या अशा मिश्किल टिप्पणीनंतर उपस्थितात जोरदार हशा पिकला...