जुने नाशिक- वडाळा रोडवरील नासर्डी पूल चौफुली अतिशय धोकादायक बनली आहे. या पुलानजीक रोज वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत असून, मंगळवारी (ता.१५) या ठिकाणी भरधाव ट्रकच्या धडकेत सोळावर्षीय युवतीचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच नासर्डी पुलाची रुंदी वाढविण्यात यावी. अथवा त्यास समांतर नवीन पूल तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.