नशामुक्त जळगावसाठी समाजाच्या सहभागाची गरज

नशामुक्त जळगावसाठी समाजाच्या सहभागाची गरज
Published on: 
टुडे ४ : मेन फिचर NSK26H32828 (फोटो चार कॉलम पट्टीत वापरावा) जळगावः ‘नशामुक्त जळगाव’ अभियानाच्या लोगो अनावरणप्रसंगी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अशोक उईके, राजूमामा भोळे, नंदकुमार महाजन, अशोक जैन, रोहन घुगे, श्रीकांत धिवरे, करिष्मा नायर, आदित्य जीवने, दीपमाला काळे, मनोज चौधरी, योगेश पाटील, वैशाली पाटील, अमित पाटील, नितीन सपके आदी. ------------- शीर्षक ‘नशामुक्त जळगाव’साठी समाजाच्या सहभागाची गरज पालकमंत्री पाटील : प्रशासन, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१७ : तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी केवळ पोलिस प्रशासनाच्या कारवाईवर अवलंबून राहून चालणार नाही. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सामाजिक संस्था, उद्योजक, लोकप्रतिनिधी, पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच जळगाव जिल्हा नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा पोलिस दल आणि वैशाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित ‘नशामुक्त जळगाव अभियान’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार नंदकुमार महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली पाटील, अमित पाटील, नगरसेवक नितीन सपके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजाची साथ आवश्यक गुलाबराव पाटील म्हणाले, की व्यसनमुक्तीची सुरुवात समाजातील लहानसहान गोष्टींपासून करावी लागेल. गावोगावी वाढलेल्या पानटपऱ्या आणि त्यातून सहज उपलब्ध होणाऱ्या व्यसनाधीन पदार्थांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. व्यसनाचे वाढते प्रमाण आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यसनांचे वाढते प्रमाण आणि त्याचे तरुणांच्या आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम अधोरेखित केले. व्यसनामुळे आपला एक मित्र गमावल्याचा अनुभव सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून, शालेय वयापासूनच मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांच्या विक्रीची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. जैन उद्योग समूहाकडून सहकार्याची ग्वाही जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांच्या कंपनीच्या परिसरात कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कंपनीत तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि अन्य व्यसनाधीन पदार्थांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरुवातीला कठोर उपाय करावे लागले. मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चौकट तरुण पिढीच्या भविष्याचा प्रश्न : मंत्री महाजन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नशामुक्तीचा विषय हा केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या भविष्याशी संबंधित असल्याचे सांगितले. व्यसनांमुळे तरुणांचे शिक्षण, कुटुंबाची स्वप्ने आणि देशाच्या प्रगतीवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच जनजागृती करणे आवश्यक आहे. मुलांच्या संगतीकडे आणि वागणुकीतील बदलांकडे पालकांनी लक्ष द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com