Nashik Water Crisis : सिन्नर टँकरद्वारे तालुक्यात 10 लाख लिटर पाणीपुरवठा

Nashik News : तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत असून, गाव परिसरातील जलस्रोत आटल्याने तालुक्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईचा झळा बसत आहे.
A dry dam at Dhodambar in the taluka.
A dry dam at Dhodambar in the taluka.esakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत असून, गाव परिसरातील जलस्रोत आटल्याने तालुक्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईचा झळा बसत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या मागणीत देखील वाढ झाली असून सद्य:स्थितीत पंचायत समितीमार्फत ११ गावे २०६ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरद्वारे दररोज सुमारे १० लाख ४६ हजार लिटर पाणी पुरविले जात आहे. (10 lakh litre water supply in taluk through Tanker)

सिन्नर तालुक्यात मागीलवर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या देवनदीचे पात्र तसेच नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांसह पूर्व भागातील विविध गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना वणवण करण्याची वेळ आलेली आहे.

यातच टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. कडक उन्हाने ग्रामीण भागातील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. नद्या-नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे व गावतळे पावसाच्या पाण्याअभावी कोरडेठाक आहेत.

जनावरांचे हाल

नदी-नाले अथवा बंधाऱ्यांमध्ये अल्पसा पाणीसाठा उपलब्ध राहिल्यास त्यावर परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागलेला असतो. मात्र जलस्रोत कोरडेठाक पडल्याने पशुधनाच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाऊस अत्यल्प झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. (latest marathi news)

A dry dam at Dhodambar in the taluka.
Nashik News : मोदींच्या सभेत झिरवाळ यांचे मानापमान नाट्य

एकाच दिवशी ३० टँकरचे प्रस्ताव

यापूर्वी केवळ १० शासकीय व ७ खासगी टँकरद्वारे ५ गावे व ८८ वाड्या-वस्त्यांची तहान भागविली जात होती. मात्र, मागील चार ते पाच दिवसांतच ३० टँकरचे प्रस्ताव आले. त्यामुळे पंचायत समितीवर कामाचा ताण वाढला. कागदपत्रांची पूर्तता करण्यात बराच वेळ गेला. आता पाटपिंप्री, निमगाव सिन्नर, साबरवाडी या गावांच्या वाड्या-वस्त्यांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. डुबेरे (ता. सिन्नर) येथे विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आला आहे.

शहरवासीयांवर पाण्याचे संकट

सिन्नर शहराला कडवा पाणीयोजनेसह दारणा नदीपात्रातील पळसे पंपिंग स्टेशनवरून पाणी येते. मात्र, अनेकदा अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिन्नर शहरातील अनेक भागांना तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यातही तांत्रिक दोष उद्भवल्यास पाणीपुरवठ्यास विलंब होतो. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासियांवर देखील पाणीटंचाईचा सावट आहे.

A dry dam at Dhodambar in the taluka.
Nashik News : पावसाची विश्रांती, तापमानात वाढ! कमाल तापमान पुन्‍हा 40 अंशांच्‍या उंबरठ्यावर

तालुक्यात आठवड्यातून एकदा पाणी

ग्रामीण भागातील अनेक गावात पाच किंवा सहा दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांना ते पाणी जपून वापरावे लागत आहे. सध्या अनेक नद्या कोरड्या पडल्याने पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला असून पिण्यासाठी दरमजल करीत नागरिकांना पाणी आणावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले असून. यावर टॅंकरद्वारे उपाययोजना करण्यात आलेली आहे.

"विविध गावांतील वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच गाव व वाड्यांच्या लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपांचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. कोणत्याही गावांचे किंवा वाड्या-वस्त्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यास तातडीने प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहे."- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार

A dry dam at Dhodambar in the taluka.
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com