Nashik Lok Sabha Election : 107 वृद्ध, 10 दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election : आजारपण, वृद्ध आणि दिव्यांगत्व असलेल्यांच्या घरोघरी जात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मागणी असलेल्या वृद्ध आणि दिव्यांग १३० पैकी ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Vote
Votesakal

सिन्नर : मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने उपक्रम हाती घेतला आहे. आजारपण, वृद्ध आणि दिव्यांगत्व असलेल्यांच्या घरोघरी जात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मागणी असलेल्या वृद्ध आणि दिव्यांग १३० पैकी ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Nashik 107 elderly and 10 disabled persons vote)

सिन्नर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या ८५ वर्षांवरील १२० आणि दिव्यांगत्वामुळे मतदार केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या १० दिव्यांग बांधवांनी घरपोच मतदान प्रक्रियेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने या मागणीची दखल घेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, संजय धनगर यांच्या नेतृत्वाखाली घरपोच मतदान प्रक्रियेची मोहीम राबवली.

पहिल्या टप्प्यात ११ आणि १२ मे रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता. १४) या पथकांनी घरोघरी जात गोपनीय मतदान करून घेतले. प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांचे एक याप्रमाणे ६ पथके तयार करण्यात आली होती. (latest marathi news)

Vote
Nashik Lok Sabha Constituency : धर्मसत्तेतील साधू-महंतांना राजसत्तेचा मोह कशापायी?

पेनच्या सहाय्याने पसंतीचे मतदान केले. या मतपत्रिका सिन्नर कोषागारात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक टपाली मतदानाची मोजणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रतिनिधींसमोर केली जाणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले.

५१३९ वृद्ध, ६६७ दिव्यांग मतदार

सिन्नर विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांहून अधिक वयाचे ५१३९ मतदार आहेत. त्यापैकी फक्त १२० मतदारांनी आणि ६६७ दिव्यांग मतदारांपैकी १० अशा १३० जणांनीच आपण मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम नसल्याने घरपोच टपाली मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी केली होती.

Vote
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com