

नाशिक : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या महिनाभराच्या काळात जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोगाचे भरारी पथक, पोलिसांच्या विविध यंत्रणांनी आतापर्यंत साडेपाच कोटींच्या रोकडसह एकूण १४ कोटी ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी (ता. १८) संपला. मात्र, मतदारांना प्रलोभने दाखविण्याचा ‘उद्योग’ सुरू आहे. (14 crore 76 lakh worth of goods seized cash worth five crore )