
नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे झालेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. २६) रात्री उशिरा जाहीर झाला. अंतिम परीक्षेत नाशिकच्या प्रसन्नाकुमार सुराणा याने राष्ट्रीय क्रमवारीत सोळाव्या क्रमांकासह यश मिळविले. नोव्हेंबरमध्ये अंतिम परीक्षा झाली.