
नाशिक : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर, राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश काढले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने तीन हजार १०८ शाळांसाठी १८ हजार ५३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला. मात्र, शिक्षणसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी जिल्हा नियोजन समितीने खर्च केल्याने, सीसीटीव्हीकरिता निधी कुठून आणायचा, हा प्रश्न पडला आहे. (18 thousand CCTV cameras for three thousand schools in district)