Grampanchayat Election esakal
नाशिक
Grampanchayat Election : जिल्ह्यात 181 ग्रामपंचायतींचा वाजणार बिगुल; कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता लवकरच निवडणूक कार्यक्रम
Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या या ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. यात इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक ६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्याने आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लागून आहे.