Nashik Water Scarcity : मालेगाव तालुक्यात 19 गावे, 13 वाड्या तहानलेल्या! एप्रिलमध्ये तीव्रता आणखी वाढणार

Nashik Water Scarcity : शहराला गिरणा व चणकापूर या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका हद्दीत पाणीटंचाई नसली तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र दिवसेंदिवस तीव्रता वाढत आहे.
Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcityesakal

Nashik Water Scarcity : शहराला गिरणा व चणकापूर या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका हद्दीत पाणीटंचाई नसली तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र दिवसेंदिवस तीव्रता वाढत आहे. तालुक्यात १९ गावे व १३ वाड्या अशा एकूण ३२ ठिकाणी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या रोज ४० फेऱ्या होत आहेत. पाणीटंचाईच्या झळा तालुक्यातील दक्षिण भागाला मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. (Nashik 19 villages 13 mansions are in Water Scarcity in Malegaon taluk marathi news)

सौंदाणेसारख्या मोठ्या गावातूनही टँकरची मागणी होत आहे. आगामी एप्रिल- मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता आणखी भासणार आहे. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍नही निर्माण होणार आहे. शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीने येथील जलकुंभात पाणी येते. तसेच, चणकापूर धरणातून डाव्या कालव्याद्वारे आवर्तनाच्या पाण्याने तळवाडे तलाव भरुन घेतला जातो. तळवाडे तलावातून जलवाहिनीद्वारे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात येते.

येथे दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गिरणा व चणकापूर धरणातील तसेच तळवाडे तलावातील जलसाठा पाहता महापालिका हद्दीत पाणीटंचाईच्या झळा फारशा जाणवणार नाहीत. चणकापूर धरणावर दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. योजनांच्या विविध गावांमध्ये चार ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. चणकापूरमधून पिण्याचे आणखी दोन आवर्तने मिळू शकतील.

गिरणा धरणावर अवलंबून असलेली २६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या गावांना १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी तर महिन्यातून एकदा पाणी येते. तालुक्याच्या दक्षिण भागात अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबरपासूनच टँकर सुरु करण्यात आले आहेत. तालुक्यातील काटवनमध्ये देखील पाणीटंचाई तीव्र आहे. सद्यस्थितीत खालचे टिपे, वरचे टिपे, रामपूरा, कजवाडे, सावकारवाडी, एरंडगाव, ज्वार्डी बुद्रुक, नगाव (दि), मेहुणे, घोडेगाव, मांजरे, चोंढी, टाकळी, शिरसोंडी, पोहाणे, निंबायती व दुंधे या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. .(latest marathi news)

Nashik Water Scarcity
Summer Heat Rise : तापमानाचा पारा चाळिशी पार; पहिल्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

जळगाव (निं.) येथील कोरेवस्ती, कऱ्हेवाडी, मांडेवाडी, काळेवाडी, आदिवासी वस्ती, कृष्णानंद नगर, वऱ्हाणे पाडा, मांजरे येथील पवारवाडी, इंदिरानगर, चोंढी येथील पगारे, अहिरे वस्ती, पोमणवाडी, म्हाळसाबाई नगर, खेमनखडी या वस्त्यांनादेखील टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टँकरचा दर सहाशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान आहे. शहराच्या चारही बाजुंनी नवीन बांधकामांसाठी टँकरने पाणी विकत घेतले जात आहे. आगामी काळात पाण्याच्या टँकरचे दर आणखी वाढू शकतील.

जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार

तालुक्यात गेल्यावर्षी अनेक गावांमध्ये सरासरीच्या ३० ते ३५ टक्के एवढाच पाऊस झाला. त्यामुळे आगामी एप्रिल- मे मध्ये जवळपास निम्म्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांसाठी तीन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टँकर भरण्यासाठी एकूण १७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुक्याचा पश्‍चिम भाग व माळमाथ्यावर देखील काही गावांमध्ये विहिरी व पाणीपुरवठा योजनांनी ताण दिल्याने टंचाईची परिस्थिती आहे. ही परिस्थिती पहाता गावे व टँकरची संख्या दुप्पटीने वाढू शकेल. तसेच जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍नही निर्माण होणार आहे. प्रशासनाने चारा छावण्यांसाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Nashik Water Scarcity
Summer Heat : पर्वत रांगा अन्‌ थंड हवेच्या तालुक्यातही उष्णतेची लाट! तापमानाने ओलांडली चाळिशी

''मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. सध्या १९ गावे व १३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सौंदाणेसारख्या मोठ्या गावातून टँकरची मागणी आली आहे. या संदर्भात गावाला भेट देऊन तात्काळ निर्णय घेतला जाईल. टँकरच्या मागणी संदर्भातील प्रस्ताव आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. शासनाने १५ मार्चपासून विहिर अधिग्रहणाचे अधिकार तहसिलदारांना दिले आहे. तालुक्यात पाणीटंचाई संदर्भात आवश्‍यक त्या उपाययोजना तात्काळ केल्या जातील.''- नितीनकुमार देवरे, तहसीलदार, मालेगाव

टंचाईग्रस्त गावे - १९

टंचाईग्रस्त वाड्या- १३

रोजच्या खेपा - ४०

विहिर अधिग्रहण - गावासाठी - ३

विहिर अधिग्रहण- टँकरसाठी - १७

एकूण टँकर - १७

Nashik Water Scarcity
Summer Heat : रसवंतीच्या घुंगरमाळा, लावि रसशौकिनांना लळा! ऊन्हाच्या कडाक्यात वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com