Nashik Vidhan Sabha Election 2024esakal
नाशिक
Nashik Vidhan Sabha Election : खाट, झुला, रिंग, चप्पल, चमचा अन चॉकलेटही..! अपक्षांना गमतीदार चिन्हांसह 190 चिन्हांचे पर्याय उपलब्ध
Latest Vidhan Sabha Election News : राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारास ‘एबी फॉर्म’ मिळाल्यावर अधिकृत चिन्ह मिळते.
येवला : शिटी, कूकर, पतंग, पिपाणी, गॅस सिलिंडर ही निवडणुकीत अपक्षांसाठीची लोकप्रिय चिन्हे अनेक वर्षांपासून आहेत. मात्र, या वेळी या चिन्हांच्या यादीत आता पंच मशिन, खाट, चॉकलेट, जहाज, झुला, ब्रश, शार्पनर, रिंग, चप्पल, लिफाफा, चमचा, कढई, पाना, काठी या गमतीदार चिन्हांसह घसघशीत १९० चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले. फक्त चिन्हेच वाढलेली नाहीत; तर त्यात नावीन्यता आली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारास ‘एबी फॉर्म’ मिळाल्यावर अधिकृत चिन्ह मिळते. (190 icon options available for freelancers in assembly election )