
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भिंती आपण बोलक्या झाल्याचे ऐकले असेल, पण आता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतींही बोलक्या होणार आहेत. जिल्ह्यातील ६० पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दोन कोटींच्या ‘सेस’ निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्तीसाठी निधी मिळत नव्हता. सदस्य, पदाधिकारी सभागृहात असताना, या विषयावर तासन्तास चर्चा करीत होते.