NMC Electric Charging Station: 2 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञान कालबाह्य ठरणार! महापालिकेचे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन वादात

Nashik News : कालबाह्य होत असलेले तंत्रज्ञान महापालिकेकडून अमलात आणले जात असल्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे
electric Charging Station
electric Charging Stationesakal

नाशिक : महापालिकेकडून शहरात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरवात झाली असली तरी चार्जिंग स्टेशन पूर्ण होतील, त्या वेळी हायड्रोजन वाहने रस्त्यावर उतरणार असल्याने चार्जिंग स्टेशन कालबाह्य ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी चार्जिंग स्टेशन तयार झाले असते तर त्याचा फायदा झाला असता. परंतु, कालबाह्य होत असलेले तंत्रज्ञान महापालिकेकडून अमलात आणले जात असल्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे. (Nashik 2 years old technology will become obsolete NMC electric vehicle charging station in controversy marathi news)

पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच प्रदूषणमुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्‍यकता आहे. शहरात महापालिकेचे एकही चार्जिंग स्टेशन नाही.

नवीन इमारतींमध्ये आता बांधकाम व्यावसायिकांकडून व्यवस्था केली जात आहे. तूर्त सोसायटीच्या पार्किंगमधील वीजजोडणी माध्यमातून वाहने चार्जिंग केली जातात. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने तेवढ्या प्रमाणात ई-चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे.

त्यामुळे नॅशनल क्लीन एअर पॉलिसी (एन-कॅप) अंतर्गत केंद्र सरकारने निधी दिला आहे. ई- चार्जिंग स्टेशनकरिता महापालिकेने शहरात १०६ जागा निश्चित केल्या. यात पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. तीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील वीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आचारसंहिता संपेपर्यंत काम पूर्ण होईल.  (latest marathi news)

electric Charging Station
NMC News : अनुदान कपातीचे संकट महापालिकेने परतविले; जीएसटी अनुदानातून रक्कम कपात पाणीपुरवठा विभागाला अमान्य

प्रशासनाकडून विलंब

इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशन उभारणीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी होता. परंतु, महापालिका प्रशासनाकडून विलंब लावण्यात आला. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेदेखील विलंब झाला. आता नवीन तंत्रज्ञान मार्केटमध्ये येत असताना ज्या वेळी महापालिकेचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होतील, त्या वेळी चार्जिंग स्टेशन कालबाह्य ठरणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशन ठिकाणे

राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडिअम, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर, अंबड लिंक रोड.

electric Charging Station
NMC News : महापालिकेला यांत्रिकी झाडू देण्यास केंद्राचा नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com