.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जुने नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक वा अन्य वाद्यांच्या पथकाने एका ठिकाणी २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबू नये. तसेच प्रत्येक पथकामध्ये केवळ ५० वादकांचा सहभाग असावा. प्रत्येक पथकाबरोबर अतिरिक्त वादक ठेवावेत आणि वेळेत मिरवणूक पूर्ण करावी, अशा सूचना भद्रकाली पोलिस ठाण्यात आयोजित ढोल पथकाच्या बैठकीत देण्यात आल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची भूमिकाही महत्त्वाची असते. (20 minutes limit for dhol teams in processing Various instructions to team)