
नाशिक ः नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांनी शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅलीद्वारे मंगळवारी (ता. २९) अर्ज दाखल केला. याशिवाय, स्वराज्य पक्षाकडून करण गायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गिते यांच्यासह मतदारसंघात आतापर्यंत १९ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (ता. ३०) छाननी होईल. (nashik 23 candidates filed from Nashik East in assembly election on last day )