
जुने नाशिक : महापालिका पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाने विविध प्रकारच्या ८८ कारवाई करून ३ लाख ६३ हजारांचा दंड वसूल केला. महापालिकेतर्फे रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिकांकडून रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्याचप्रमाणे उघड्या मैदानावर आणि रस्त्यांवर कचरा जाळणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा विविध प्रकारांना प्रतिबंध करण्यात आला आहे.