Nashik : जिल्ह्यातील 25 वर तांड्याचे पलटणार भाग्य; संत सेवालाल महाराज समृद्धी योजनेतून प्रत्येकी 30 लाखाचा निधी

Nashik : वेगवान प्रगतीत आजही सुमारे २० ते २५ लाख बंजारा-लमाण समाजाचा अपेक्षीत विकास झालेला नाही.
fund
fundesakal
Updated on

Nashik : वेगवान प्रगतीत आजही सुमारे २० ते २५ लाख बंजारा-लमाण समाजाचा अपेक्षीत विकास झालेला नाही. या समाजाला विकासाच्या मुळ प्रवाहात आणून, राहणीमान उंचवावे, उत्पन्नाचे स्रोत वाढावे आणि स्थिरता प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ग्रामविकास विभागाने संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना सुरू केली आहे. (nashik funding to each village from Sant Sevalal Maharaj Samriddhi Yojana marathi news)

या योजनेतून तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी अंतराची अट शिथिल केली असून योजनेतून प्रत्येक तांड्याला ३० लाखांपर्यत विकासासाठी निधी मिळणार आहे. तांड्याच्या विकासासाठी उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील २५ ते ३० तांड्यांचे भविष्यात रूपडे पालटवणार आहे.

बंजारा, लमाण समाज (गोरमाटी) विखुरलेल्या स्वरूपात रुढी परंपरेनुसार तांडा निर्माण करून मुख्य गावापासून दूर विशेषतः डोंगराळ भागामध्ये राहतात. उपजिविकेसाठी सततच्या भटकंतीमुळे शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सुविधेपासून सदर समाज वर्षानुवर्षे वंचित आहे.

या तांड्याला गावठाणचा अन महसुल गावाचा दर्जा दिलेला नसल्याने विकास हा शब्द आजही कोसो दूर आहे. त्यामुळे गावाचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे, पाणी, वीज, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य, पथदिवे, गटार, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल.

fund
Nashik News : ‘इस्पॅलियर’च्या विद्यार्थ्यांचा वादनातून जागतिक विक्रम; रिसायकल प्लॅस्टिक बॅन्डचे सादरीकरण

स्वतंत्र ग्रामपंचायतीचा मार्ग मोकळा

२००४ मधील निर्णयात बदल करत तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील ३ किमी अंतराची अट रद्द केली आहे. तांड्यांची लोकसंख्या १००० पेक्षा कमी असली तरी एकापेक्षा जास्त तांडे एकत्रित करून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यास तसेच १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असल्यावर आजुबाजुचे छोटे तांडे असतील तरीही गट ग्रामपंचायत स्थापन होऊ शकणार आहे.

जनगणनेच्या निकषाबरोबर तांड्यामधील हंगामी स्थलांतरित लोकसंख्या लक्षात घेऊन तांडा घोषित करण्याची कार्यवाही होऊन स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देखील दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तांडे विखुरलेले असल्याने दोन किलोमीटर परिसरातील साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या वसाहतींनाही महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची रचनाही केली जाणार आहे.

fund
Nashik News : शहरात 9 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू!

५०० कोटींची तरतूद

पुढील तीन वर्षात प्रत्येक तांड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम जिल्हा परिषदेने राबवावा असे निश्चित केले गेले असून या तांड्यांच्या विकासासाठी सुमारे ५०० कोटीचा निधीची तरतूद शासनाने केली असून प्रत्येक तांड्यासाठी ग्रामपंचायतीच्या मंजूर आराखड्याप्रमाणे किमान तीस लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध केला जाणार आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील तांड्यांचे रुपये पलटणार आहे. विशेषता: नांदगाव, येवला, सिन्नर, निफाड, मालेगाव, नाशिक, चांदवड, सटाणा आदी तालुक्यातील तांड्यांना याचा लाभ होऊ शकेल.

किलोमीटरच्या अटीमुळे ग्रामपंचायत स्थापन करण्याला

''अडचणी येत होत्या,आता ही अट रद्द केल्याने मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाचे स्वागतच आहे. याशिवाय स्वातंत्र्यापासून विकास रखडलेले तांड्यांसाठी स्वतंत्र योजना व निधी शासनाने उपलब्ध केल्याने त्याचेही स्वागत आहे. या सर्व निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तांड्याना योजनांचा लाभ द्यावा.''- पंचफुला दळवी, सदस्य, अनकाई ग्रामपंचायत (latest marathi news)

fund
Nashik News : राज राजेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com