Nashik News : थकीत कर वसुलीसाठी सटाण्यात 30 नळ जोडण्या खंडित

Nashik News : नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी शुक्रवार (ता.१५) पासून धडक वसुली जप्ती मोहीम सुरवात केली आहे
Employees disconnecting taps of outstanding property owners in the city.
Employees disconnecting taps of outstanding property owners in the city.esakal

सटाणा : नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी शुक्रवार (ता.१५) पासून धडक वसुली जप्ती मोहीम सुरवात केली आहे. वारंवार आवाहन करूनही कर थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नळ जोडण्या खंडित केल्या जात असून आतापर्यंत ३० होऊन अधिक नळ जोडण्या तोडण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसात प्रत्येक प्रभागात बॅनरद्वारे थकबाकीदारांची नावानिशी याद्या लावल्या जाणार असल्याने शहरातील थकीत मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे. (Nashik tap connection broken in Satana marathi news)

गेल्यावर्षी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांकडून पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करून कर वसुलीचे उदिष्ट पूर्ण करण्यात यश मिळवले होते. यावर्षी चित्र उलटे दिसू लागल्याने नगरपरिषद प्रशासनाला उदिष्ट पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले व वसुलीसाठी नियुक्ती केलेल्या विशेष पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

त्यालाही काही थकीत मालमत्ताधारक दाद नसल्याने मुख्याधिकारी भोसले यांनी थकबाकी मालमत्ताधारकांना यापूर्वी कर विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आलेल्या असून थकबाकीदारांना जप्ती अधीपत्र बजावण्यात आलेले आहे. तसेच थकबाकी असलेल्या मालमताधारकांच्या मालमत्ता सील करून थकीत मालमत्तांच्या नळ जोडणी तोडण्यास नगरपरिषदेतर्फे सुरवात केली आहे.

Employees disconnecting taps of outstanding property owners in the city.
Moral Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? पाच मुद्द्यांत जाणून घ्या प्रकरण

"कारवाईसाठी नगरपरिषदेने पाच विशेष वसुली पथके तयार केली आहे. शंभर टक्के कर वसुलीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार विचारणा होत आहे. पुढील दोन दिवसात नगरपरिषदेमार्फत थकबाकीदारांची नावानिशी यादी प्रत्येक प्रभागात बॅनर लावून व वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर कराचा भरणा करून कटू कारवाई टाळावी"- चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी

Employees disconnecting taps of outstanding property owners in the city.
Polio Vaccination : पोलिओ लसीपासून 1 हजार 53 कुटुंब वंचित! 1 लाख 13 हजार 920 बालकांना पोलिओ डोसचे उद्दिष्ट पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com