.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : शहरात पावसामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिकेच्या बेजबाबदार कामाचे नमुने यानिमित्ताने उघड झाले आहेत. एकीकडे रस्त्यांची दयनीय अवस्था होऊन जागोजागी खड्ड्यांची रांगोळी पडली आहे. असे असतानाही महापालिकेने ३१ कोटींहून अधिक रुपये रस्ते दुरुस्ती व खड्ड्यावर खर्च केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या रक्कमेचे धनादेशदेखील ठेकेदारांना वळते झाल्याने महापालिकेने नेमके काम केले कुठे, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. (31 crore spent even before potholes are filled of municipal corporation )