जादा विषयात साडेतीनशे कोटींचे प्रस्ताव

जादा विषयात साडेतीनशे कोटींचे प्रस्ताव
Published on: 
टूडे साठी -------------- जादा विषयात साडेतीनशे कोटींचे प्रस्ताव घरकुलांनाही आता पट्टी; स्थायी समितीमध्ये नाराजीनाट्य सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : महापालिकेच्या तिजोरीवर भार टाकणाऱ्या तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांच्या जादा विषयांवरून आणि घरकुलांना स्लम पट्टी लागू करण्याच्या निर्णयावरून स्थायी समितीमध्ये नाराजीनाट्य रंगले. सभा सकाळी साडेअकरा वाजता बोलावण्यात आली होती. मात्र नियोजित वेळेत एकही सदस्य हजर नसल्याने सभा दीड तास उशिराने सुरू झाली. सदस्य येताच त्यांनी जादा विषयावरून आयुक्त मनिषा खत्री यांच्यासमोरच नाराजीचा पाढा वाचला. दरम्यान घरकुलांना स्लम पट्टी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्य राहुल दिवे, मुकेश शहाणे, किरण गामणे यांनी आरोप केला की, जादा विषयांची यादी दोन दिवस आधी प्राप्त होऊनही नगरसचिव विभाग ती सदस्यांना देत नाही. परस्पर मंजुरी दाखवून विषय पुढे रेटले जातात. आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. या तक्रारीनंतर आयुक्त खत्री यांनीही संताप व्यक्त केला. नगरसचिवांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यापुढे सभेपूर्वीच जादा विषयांची यादी सदस्यांना देण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. दुसरीकडे मंजूर प्रस्तावांचे कार्यादेशच दिले जात नसल्याने सदस्य रंजना बोराडे, भारती ताजनपुरे, राहुल दिवे यांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदार जाणीवपूर्वक कार्यादेश घेण्यास टाळाटाळ करत असल्याकडे योगेश गाडेकर यांनी लक्ष वेधले. यावर आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेत कार्यादेश नाकारणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. झोपडपट्टी निर्मूलन योजनेतील घरकुलांना घरपट्टी लागू करण्यात आली असून त्यात स्लमपट्टी लावण्याची मागणी दीपाली कुलकर्णी यांनी केली. त्यावर आयुक्तांनी कर विभागाला घरकुलांना स्लमपट्टी आकारण्याचे आदेश दिले. या घरांची देखभाल दुरुस्ती महापालिकेने करावी, अशी सूचना गाडेकर यांनी केली असता, पोटभाडेकरू ठेवलेल्या घरकुलांवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com