Nashik RTO Revenue : ‘आरटीओ’ला 367 कोटींचा महसूल! वर्षभरात 1 लाख 1 हजार 619 वाहनांची नोंद

Nashik News : प्रादेशिक परिवहन विभागाला १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये सुमारे ३६७ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४८ कोटी १३ लाख २९ हजार ८२३ रुपयांची वाढ झाली आहे.
RTO Revenue
RTO Revenueesakal

पंचवटी : प्रादेशिक परिवहन विभागाला १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये सुमारे ३६७ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४८ कोटी १३ लाख २९ हजार ८२३ रुपयांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ६१९ वाहनांची नोंद झाली असून २०२२ ते २०२३ च्या तुलनेत १४ हजार ६४१ वाहनांची वाढ झाल्याची माहिती प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. (Nashik 367 crore revenue to RTO marathi news)

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन नोंदणी, वाहन चालविण्याचे परवाने आदींसह वायुवेग पथकांमार्फत करण्यात येणारी कारवाई आणि विविध करांपोटी महसूल जमा होतो. या माध्यमातून १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मध्ये ३१८ कोटी ८७ लाख ४३ हजार २९९ रुपयांचा महसूल मिळाला होता.

तर १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये ३६७ कोटी ७३ हजार ४२२ कोटींचा महसूल नवीन वाहनांच्या नोंदीतून मिळाला. एप्रिल २०२२ ते १ मार्च २०२३ या वर्षात ८६ हजार ९७८ वाहनांची नोंद झाली होती. तर १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षात १ लाख १ हजार ६१९ नवीन सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद झाली आहे.

यात ट्रॅक्टर ३१, बांधकाम वस्तू वाहण्याच्या वाहनांमध्ये ७९ ने वाढ झाली आहे. तसेच डंपर ७९, मालवाहू वाहन ३४, दुचाकी १२ हजार ६३४, प्रवासी वाहन (मोटर कॅब) १६८, चारचाकी वाहने १ हजार ७२, रिक्षा मालवाहू १०, प्रवासी रिक्षा ७४४, क्रेन २२, उत्खनन वाहन (पोकलॅंड) १८ अशी वाढ झाली आहे.

RTO Revenue
सरकारचा अजब न्याय! १० वर्षे काम करणारे राष्ट्रीय आरोग्यचे कर्मचारी नियमित, २३ वर्षांपासून सेवा देणारे कधी होतील कायम?

तसेच रुग्णवाहिका ३, बस ६, मोपेड २७०, ट्रेलर १० या वाहनांची घट झाली आहे. महसूल वाढीसाठी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, विलास चौधरी, मोटर वाहन निरीक्षक तसेच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

मार्चमध्ये वाहन विक्रीत घट

चालू वर्षातील १ मार्च ते ३१ मार्च २०२४ मध्ये ४४७ वाहन विक्रीत ४४७ वाहनांची घट झाली आहे. २०२२/२३ मध्ये १ मार्च ते ३१ मार्च २०२३ या महिन्यात ७४६१ वाहनांची विक्री झाली होती. यात ३ कोटी २० लाख १४ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता. तर १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या महिन्यात ७ हजार १४ नव्या वाहनांची नोंद झाली असून त्यापोटी २ कोटी ८६ लाख २४ हजार ८२१ रुपये महसूल मिळाला आहे. यात ३३ लाख ४२ हजार ५४५ रुपयांच्या महसुलात घट झाली आहे.

RTO Revenue
Central Railway News : मध्य रेल्वेकडून 89.24 दशलक्ष टन मालवाहतूक! 9446 कोटीचा महसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com