Nashik News : नाशिकच्या 4 कंपन्या आफ्रिकेत उभारणार उद्योग! ‘आयडियास 2022’च्या आधारे सामंजस्य करार

Nashik News : भारत व दक्षिण आफ्रिकेतील ‘आयडियास २०२२’ या व्यापार कराराच्या आधारे आफ्रिकेत उद्योग स्थापन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चार कंपन्यांची निवड झाली आहे.
Factory
Factoryesakal

नाशिक : भारत व दक्षिण आफ्रिकेतील ‘आयडियास २०२२’ या व्यापार कराराच्या आधारे आफ्रिकेत उद्योग स्थापन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चार कंपन्यांची निवड झाली आहे. त्यांना लागणारे भांडवल भारत सरकार कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देत असून, या कंपन्यांचे प्रतिनिधी येत्या २४ एप्रिलला आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (Nashik 4 companies of Nashik will set up industries in Africa contract based on Ideas 2022)

दक्षिण आफ्रिका व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फॉर एशिया (वेफा) यांच्या संयुक्त विद्यमाने सौर तंत्रज्ञान, साखर उद्योग, सेंद्रीय कृषी निविष्ठा, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या क्षेत्रांतील छोट्या कंपन्यांची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी ओपेरिस ॲग्रो टेक्नॉलॉजीसची मदत घेतली जात आहे.

नाशिकमधील कृषी क्षेत्रातील पूर्वा केमिकल्स, कृषिदूत, ड्रीम इंडिया व जी ॲण्ड पी ॲग्रो या चार कंपन्यांची वेगवेगळ्या उत्पादनांसाठी निवड झाल्याची माहिती ‘ओपेरिस’चे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ आशिष वेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘ओपेरिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव धांडे, संशोधक संचालक वैशाली धांडे, ‘वेफा’चे उपाध्यक्ष तापीवा मशेंजरे, प्रतीक शर्मा, डॉ. विजय म्हसदे उपस्थित होते. . (latest marathi news)

Factory
Healthy Food :  केवळ बदाम नाहीतर भिजवलेले काजू खाण्याचेही आहेत अनेक फायदे, प्रयोग करून तर पहा

तापीवा मशेंजरे म्हणाले, की गेल्या आठ दिवसांत भारतीय कंपन्यांना भेट दिली. सौरउर्जेसाठी वॉरक्राफ्ट या कंपनीची निवड केली आहे. निवड करताना मोठ्या कंपन्यांना प्राधान्य नसून, स्वत: मालकांनी शून्यातून उभारलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ८५० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

त्यांना उद्योगासाठी आफ्रिका, झिम्बाम्वे येथे जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीने उत्पादित केलेला माल स्थानिक बाजारात विक्रीसाठी स्थानिक कंपनीबरोबर करार केला जाईल; तर सौरऊर्जा प्रकल्पाची सर्व उत्पादने आफ्रिका सरकारच स्वीकारणार असल्याचे तापीवा यांनी सांगितले. सद्यस्थितीत चार कारखान्यांपर्यंत मर्यादित असलेली ही योजना भविष्यात विविध क्षेत्रांमध्येही विस्तारित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वेले यांनी सांगितले.

Factory
Nashik NMC News : पाणीपट्टी देयके वाटपासाठी खासगी अभिकर्त्यांची नियुक्ती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com