

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. इच्छुकांची सर्वाधिक पसंती असलेल्या नाशिक शहरातील तीन मतदारसंघासह त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीकारले जाणार आहेत. विविध शाखांप्रमुखांकडे त्याच्या जबाबदारीचे विभाजन झालेले असले तरी अर्ज स्वीकृतीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील एकच गर्दी बघायला मिळणार आहे. (4 constituencies Acceptance of applications in Collectorate)
जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार मतदारसंघ हे नाशिक शहरात येतात. देवळाली विधानसभा मतदारसंघाचा काही भाग शहरात काही ग्रामीण भागाशी जोडला आहे. याव्यतिरिक्त नाशिक पूर्व, मध्य व पश्चिम हे तिन मतदारसंघ पूर्णत: शहरी मतदारांचे आहेत. त्यासाठी मतदारसंघनिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यात नाशिक पूर्व मतदारसंघात तुकाराम हुलवळे, नाशिक पश्चिमची जबाबदारी शुभांगी भारदे तर नाशिक मध्य हा मतदारसंघ सहायक जिल्हाधिकारी चौहान यांच्याकडे आहे.
या अधिकाऱ्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारतच असल्यामुळे येथे अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे कार्यालय देखील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. उमेदवारी अर्ज २२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान दाखल करण्याची संधी आहे. त्यादृष्टीने प्रशानसनाने आत्तापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. अर्ज सादर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीसोबत केवळ पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळेल. (latest marathi news)
१० हजार रुपये अनामत
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. तर अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गातील इच्छुकांना केवळ पाच हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत २५ हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागत होती. एका व्यक्तीला जास्तीत जास्त चार अर्ज सादर करण्याची सवलत आहे. त्यासाठी एकाच अर्जाची अनामत भरावी लागेल.
खर्च मर्यादा ४० लाख रुपये
उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १२ लाखांनी वाढवून ४० लाख रुपये करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल. अर्ज दाखल करण्याच्या किमान एक दिवस आधी हे खाते उघडलेले असावे.
अर्ज स्विकृतीचे ठिकाण
नाशिक पूर्व : उपजिल्हाधिकारी प्रशासन यांचे कार्यालय
नाशिक मध्य : सहायक जिल्हाधिकारी कार्यालय
नाशिक पश्चिम : पुनर्वसन शाखा
इगतपुरी : उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.