Nashik Water Shortage: नाशिक जिल्ह्यात उरला 44 टक्के जलसाठा! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

Water Crisis : कसमादेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये आजअखेर केवळ ४४ टक्के जलसाठा उरला आहे.
Water Shortage
Water Shortageesakal

मालेगाव : कसमादेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये आजअखेर केवळ ४४ टक्के जलसाठा उरला आहे. आगामी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जेमतेम ४० टक्के जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरवावा लागणार आहे.

कसमादेतील चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, गिरणा, पुनंद व माणिकपुंज या धरणांमधील संपूर्ण पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विविध पाणीपुरवठा योजनांना ४ ते ८ दिवसाआड पाणीपुरवठा करूनच पाणी पुरवावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nashik water storage in district marathi news)

नाशिकसह जिल्ह्यात सात मोठे तर लहान १७ अशी एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट आहे. आज अखेरपर्यंत धरणांमध्ये केवळ २९ हजार ६५ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाला असला तरी धरणे भरली होती. विविध धरणांमधून सिंचनासाठी एक आवर्तन देण्यात आले. कसमादेत पुनंद धरण वगळता इतर धरणांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्‍वर व काश्‍यपीमध्ये सर्वाधिक अनुक्रमे ९६ व ९१ टक्के तर वालदेवीमध्ये ८४ टक्के पाणी आहे. नाग्यासाक्याचा जलसाठा शून्यावर आहे. भोजापूर १६, माणिकपुंजमध्ये २१ तर वालखेडमध्ये फक्त २६ टक्के जलसाठा आहे.

मालेगावसह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर धरणात केवळ ४३ टक्के जलसाठा आहे. विविध धरणांमधील उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पिण्यासाठी जास्तीत जास्त दोन आवर्तने मिळू शकतील. हा कालावधी ४५ ते ५० दिवसा दरम्यानचा असेल.

जागोजागी दिसणार टॅंकर

ग्रामीण भागात आताच अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. उपलब्ध पाणी पुरविण्याची कसरत संबंधित यंत्रणांना करावी लागणार आहे. कसमादेसह जिल्ह्यात उन्हाळ्यात यात्रा-जत्रांचा जल्लोष असतो.

अक्षयतृतीयेला गावागावात ग्रामदैवताचा यात्रोत्सव होतो. याच काळात लग्नसोहळ्यांची धूम आहे. अशा परिस्थितीत जागोजागी पाण्याचे टॅंकर धावताना दिसल्यास नवल वाटू नये. (Latest Marathi News)

Water Shortage
Nashik Water Crisis: पिंपळदर गाव परिसरात विहरी, कूपनलिका आटल्याने कांदा पिकात सोडली गुरे

जिल्ह्यातील पाण्याचा उपलब्ध साठा ( दशलक्ष घनफूटमध्ये)

धरणाचे नाव - क्षमता - आजचा साठा - टक्केवारी

गंगापूर - ५६३० - ३४५५- ६१.३७

काश्‍यपी - १८५२ - १६९९ - ९१.७४

गौतमी गोदावरी - १८६८ - १०५०- ५६.२१

आळंदी - ८१६ - ४५३ - ५५.५१

पालखेड - ६५३ - १७६- २६.९५

करंजवण - ५३७१ - २५१४ - ४६.८१

वाघाड - २३०२ - ५९९- २६.०२

ओझरखेड - २१३० - ९२०- ४३.१९

पुणेगाव - ६२३- ३०७- ४९.२८

तिसगाव - ४५५- १२४ - २७.२५

दारणा - ७१४९- ३१३३- ४३.८२

भावली - १४३४- ४८१- ३३.५४

मुकणे - ७२३९- ३२५३- ४४.९४

वालदेवी- ११३३ - ९५७- ८४.४७

कडवा - १६८८- ५७७ - ३४.१८

नांदुरमध्यमेश्‍वर - २५७- २४८- ९६.५०

भोजापूर - ३६१- ५९- १६.३४

चणकापूर - २४२७- १०४६- ४३.१०

हरणबारी - ११६६- ४७९- ४१.०८

केळझर- ५७२ - २५४- ४४.४१

नागासाक्या- ३९७-- ०० - ००

गिरणा - १८५०० - ६१७४- ३३.३७

पुनंद - १३०६- १०३५- ७९.२५

माणिकपुंज - ३३५ - ७२ - २१.४९

Water Shortage
Nashik Water Crisis: धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट! दारणा 43 तर भावलीत 32 टक्के पाणीसाठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com